माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्त्व
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान महत्व:- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. १) मानवी जीवनात अमुलाग्र बदल:- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने तंत्रज्ञानाने आज मानवी जीवनात आमलाग्र बदल घडवून आणले आहेत. मानवाच्या दैनंदिन जीवनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे फार उपयोगी ठरत आहे. या तंत्रज्ञानाने मानव विविध वृत्तपत्रे आज ऑनलाईन वाचू शकतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्या राज्यात देशात जगाच्या विविध कानाकोपऱ्यात विविध घटना या घडत असतात या सर्व घटनांची माहिती ही आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट यांच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध होत आहे. आपल्या नातेवाईकांशी मित्रपरिवाराशी आपण आज घरबसल्या इमेल, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, याहू मेसेंजर याद्वारे तो अगदी जलद संपर्क साधू शकतो. या तंत्रज्ञानाने मानवाच्या जीवनात जणू एक क्रांती घडवून आणली आहे. यामुळे मानवाचे जीवन हे अधिक सुकर झाले आहे. मानव हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे. २) शिक्षण क्षेत्रातील बदल:- शिक्षण क्षेत्रात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे अध्ययन अध्यापनाच्या मूल्यांवर प्रभ...