माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व

परिचय:- 
             माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आज संपूर्ण जग जवळ आले आहे.. ज्यामध्ये जगभरातील लोक इतर कोणत्याही व्यक्तीशी सहज संवाद साधू शकतात. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाने नवीन संप्रेषण क्षमतेची देणगी आज जगाला दिली आहे. त्यात इन्स्टंट मेसेजिंग, व्हाइस ओव्हर, आयपी (VOIP), व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोशल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीमुळे जगातील सर्व वापरकर्त्यांना एकमेकांशी संवाद साधता येणे शक्य झाले आहे. माहितीची प्रक्रिया, संगणन आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान होय. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ही संज्ञा माहिती तंत्रज्ञानाची विस्तारित अशी संज्ञा आहे. दूरसंचार, संगणक, सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण यावर भर देणारी आहे. या तंत्रज्ञानाने सर्व वापरकर्त्यांना माहितीची प्राप्ती होते. तसेच संग्रहण संप्रेषण आणि कुशलतेने माहिती हाताळण्यास मदत झाली आहे.
                               माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानाचे क्षेत्र असून सुमारे साठ वर्षापासून याचा जागतिक समाजावर मोठा प्रभाव दिसून येतो. तसेच आरोग्यसेवा, ऊर्जा, उत्पादन सार्वजनिक व्यवस्थापन, औषध निर्मिती, वाहतूक इत्यादी अशा अनेक क्षेत्रांवर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो.
          

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना:-
                                         माहिती संप्रेषण तंतज्ञान ही संज्ञा माहितीचे संकलन करणे माहिती व प्रक्रिया करणे व ती माहिती संप्रेषित करणे  अशा सर्व तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. कालमानाप्रमाणे तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार माहिती व संप्रेषणाच्या संकल्पनेला विविध अर्थ प्राप्त झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान ही संकल्पना 1970 च्या दशकात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. सध्या "माहिती आणि संप्रेषण"  ही संज्ञा सर्वसाधारणपणे प्रचलित असलेली दिसून येते. संगणक तंत्रज्ञान संप्रेषण तंत्रज्ञान मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान या सर्व संबंधित सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी या संज्ञांचा वापर करण्यात येतो. 1970 च्या दशकात संगणक आणि दूरसंचार तंत्रज्ञान यात फरक केला जात असे, परंतु तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे हा फरक काळाच्या ओघात कमी झाला.  थोडक्यात सांगायचे म्हणजे ही संज्ञा संगणक आणि संप्रेषण तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण होय.    

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संबंधित व्याख्या:- 

(१) मागरिट रोज:- "माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान अशी संज्ञा आहे की जिच्यात संप्रेषण उपकरणांचा आणि त्यांचे उपयोजन यांचा समावेश होतो. उदा. रेडिओ, दूरदर्शन, सेल्युलर फोन, संगणक नेटवर्क, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, उपग्रह प्रणाली तसेच विविध सेवा व त्यांच्याशी निगडित उपयोजनांचा आणि सुविधांचा समावेश होतो".

(२) युनेस्को:"माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे विविध तंत्रज्ञान साधने आणि संसाधने यांचा उपयोग, माहितीची साठवण, निर्मिती, आदान प्रदान यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानात सर्वसाधारणपणे संगणक इंटरनेट (वेबसाईट, ब्लॉग, ई-मेल) थेट प्रक्षेपणातील तंत्रज्ञान (रेडिओ, दूरदर्शन आणि वेब कास्टिंग) संकल्पित प्रक्षेपण तंत्रे, दूरभाषी (मोबाईल, उपग्रह) तंत्रज्ञान यांचा  समावेश होतो."                         


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्त्व

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान भाग आणि घटक