माहिती संप्रेषण तंत्रज्ञान भाग आणि घटक
माहिती संरक्षण तंत्रज्ञानाचे भाग:-
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने दोन भागात विभाजन केले जाते १ माहिती तंत्रज्ञान २ संप्रेषण तंत्रज्ञान.
१) माहिती तंत्रज्ञान: -या भागाचा वापर हा प्रामुख्याने डेटा गोळा करण्यासाठी तो संग्रहित करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी केला जातो.
२) संप्रेषण तंत्रज्ञान:-या भागाचा वापर हा प्रसारण, दृकश्राव्य प्रक्रिया, दूरसंचार आणि वायरलेस किंवा वायर्ड नेटवर्क द्वारे माहिती प्रसारित करण्यासाठी केला जातो.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे घटक: -
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत.
१) व्यक्ती:- व्यक्ती हा संगणकाच्या कीबोर्ड द्वारे किंवा कोणत्याही इनपुट साधनांच्या सहाय्याने डेटाची नोंद संगणकावर करतो त्यामुळे व्यक्ती हा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा घटक ठरतो.
२) डेटा:- व्यक्तीकडून संगणक प्रोग्रामचा उपयोग करून वस्तुस्थिती विषयक माहिती व सांख्यिकीय माहिती संगणक नोंदविली जाते थोडक्यात प्राथमिक स्वरूपातील माहिती व प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने संगणकात साठवली जाते.
३) हार्डवेअर:- संगणकाचे दृक स्वरूपातील विविध भाग म्हणजेच हार्डवेअर होय. या भागांच्या मदतीने डेटा संगणकात साठवला जातो त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ती माहिती अंतिम स्वरूपात संगणकाच्या पडद्यावर प्रदर्शित केली जाते.
४) सॉफ्टवेअर:- एखाद्या विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी संगणक प्रोग्राम डेटावर प्रक्रिया करत असते. ही प्रक्रिया करण्यासाठी विविध सूचनांचा संच तयार केला जातो. त्यास सॉफ्टवेअर असे म्हटले जाते.
५) माहिती:- संगणक प्राथमिक स्वरूपात जो डेटा संगणकात साठवला जातो. त्या डेटावर प्रक्रिया करून त्यास योग्य अर्थ प्राप्त देणारे डेटाचे घटक म्हणजेच माहिती होय.
६) प्रक्रिया:- विशिष्ट प्रकारचे कार्य पार पाडण्यासाठी संगणक हा क्रमाक्रमाने कार्य करत असतो त्यास प्रक्रिया असे म्हणतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा