माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्त्व

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान महत्व:-
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल.

१) मानवी जीवनात अमुलाग्र बदल:- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने तंत्रज्ञानाने आज मानवी जीवनात आमलाग्र बदल घडवून आणले आहेत. मानवाच्या दैनंदिन जीवनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे फार उपयोगी ठरत आहे. या तंत्रज्ञानाने मानव विविध वृत्तपत्रे आज ऑनलाईन वाचू शकतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्या राज्यात देशात जगाच्या विविध कानाकोपऱ्यात विविध घटना या घडत असतात या सर्व घटनांची माहिती ही आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट यांच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध होत आहे. आपल्या नातेवाईकांशी मित्रपरिवाराशी आपण आज घरबसल्या इमेल, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, याहू मेसेंजर याद्वारे तो अगदी जलद संपर्क साधू शकतो. या तंत्रज्ञानाने मानवाच्या जीवनात जणू एक क्रांती घडवून आणली आहे. यामुळे मानवाचे जीवन हे अधिक सुकर झाले आहे. मानव हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे.

२) शिक्षण क्षेत्रातील बदल:-शिक्षण क्षेत्रात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे अध्ययन अध्यापनाच्या मूल्यांवर प्रभाव पडून शिक्षणाचा दर्जा सुधारलेला दिसून येतो. विद्यार्थ्यांसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे शिक्षणात फार प्रेरणादायी ठरते. आज ई लर्निंग मुळे जे लोक किंवा विद्यार्थी दुर्गम भागात राहतात त्यांना शिक्षण घेता येणे अगदी सुलभ झाले आहे.

३) माहिती क्षेत्रावर प्रभाव:-माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा माहिती क्षेत्रावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. त्यात माहितीची निर्मिती करणे तिचे प्रसारण करणे तिचे उपर्जन करून साठवण करणे व्यवस्थापन व माहितीची विविध उत्पादने व सेवा निर्माण करणे आणि ही उत्पादने व सेवा उपभोक्तांपर्यंत पोहोचवणे यात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे महत्त्वाची भूमिका भुषवते..

४) व्यावसायिक क्षेत्रात बदल:- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे व्यावसायिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. विविध विभागात विविध प्रकारचे कार्य पार पाडण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इआरपी सिस्टम सीआरएम सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट एप्लीकेशन सारखी साधने व्यवसायाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करत आहेत.

५) वित्त क्षेत्रात बदल:- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने वित्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे त्यात अकाउंटंट व्यापारी आणि बँकांना मदत करणाऱ्या सॉफ्टवेअरमुळे जगातील बहुतांशी बँका या डिजिटल झालेल्या दिसून येतात. कारण त्यात सुरक्षितता आणि विश्वसनीयता यास महत्त्वाचे स्थान आहे.

६) वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात बदल:- आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि आज देखील ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे तंत्रज्ञान रुग्णांच्या ऑनलाईन नोदी ठेवण्यास मदत करते तसेच वैद्यकीय संशोधनाला चालना देते त्यामुळे रोगांचे चांगले उपचार होण्यास मदत होते.

७) जागतिक संवाद वाढतो:- आयसीटीमुळे जगभरातील अनेक लोक सोशल मीडिया ई-मेल व्हिडिओ कॉन्फरन्स यामुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत. आयसीटीमुळे माहितीचा प्रसार हा जलद व कार्यक्षमतेने होण्यास अधिक वाव मिळतो त्यामुळे जगभरात लोकांना महत्त्वाच्या घटना आणि घडामोडीची माहिती ही काही क्षणात उपलब्ध होते.

८) समाजावरील प्रभाव:-आयसीटी मुळे सोशल मीडिया मंच आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे समुदाय तयार करण्यास आणि तो एकत्र आणण्यास मदत झाली आहे.

९) शासन पारदर्शक बनते:- आयसीटी मुळे सरकारी सेवा सक्षम होण्यास मदत झाली आहे तसेच सार्वजनिक प्रशासनाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता यात सुधारणा घडून आली आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाद्वारे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा वाढला आहे. ही डेटा व्यवस्थापन प्रणाली अगदी वेळेवर माहिती प्रदान करते तसेच धोरण देखील तयार करते आणि त्यांच्या अंमलबजावणीमध्ये देखील मोलाचे सहकार्य करते.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान भाग आणि घटक